राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी - ॲड. प्रकाश आंबेडकर.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर एकच खळबळ माजली आहे.
परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते त्यात त्यांनी गृहमंत्री महिन्याला 100 कोटीचे टार्गेट देत आहेत तसे म्हटले होते.
यामुळे महाराष्ट्राचे आणि मुंबई पोलिसांची मान खाली गेली आहे या घटनेला अनुसरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली आहे.
आज कुणाला एक वर्ष पूर्ण झाले महिन्याला शंभर कोटी मुंबईतून उर्वरित महाराष्ट्रातून पंधराशे कोटी तर या सरकारने कोरुना च्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला असे परमवीर सिंग यांच्या पत्राचे आधार राहून लक्षात येते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन अभी तो फास्ट आहे हे सरकार भ्रष्ट आहे तरी या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करावे अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली कुमार्गाने कमावलेला पैसा कोण्या पक्षाच्या किंवा वैयक्तिक कोणी नेत्याच्या खात्यात गेला याची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीत द्वारे राज्यपालांना कळविण्यात आले आहे जोपर्यंत हा पैसा बाहेर येणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही हा भ्रष्टाचार बाहेर काढणारच .
महाराष्ट्रातल्या राजकारण - प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने १०० कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्यादृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालंय.
आम्ही वंचितच्यावतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी केली आहे .
हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ह्यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली आहे।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा